बडोदे संस्थान
बडोदे संस्थान : ब्रिटिशांकित भारतातील गुजरातमधील एक प्रसिद्ध व प्रगत संस्थान. क्षेत्रफळ सु. २०,७४० चौ. किमी,: लोकसंख्या २८,५५,००० (१९४७); वार्षिक उत्पन्न सु. साडेचार कोटी रुपये. संस्थानचा प्रदेश सलग नसून गुजरात - काठेवाडातील इतर देशी संस्थाने आणि ब्रिटिश जिल्हे यांतून विखुरलेला होता.